Ad will apear here
Next
हेमंत पाटील यांच्या विजयानंतर हिमायतनगरात जल्लोष


हिमायतनगर :
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत पाटील यांचा दोन लाख ७५ हजार १०३ मताधिक्याने विजय झाला. त्यानंतर हिमायतनगर शहरात व तालुक्यातील गावागावांत शिवसेना व भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून, गुलाल उधळून, शहरात भव्य रॅली काढून, लोकांना साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला.



हिमायतनगर शहरातील परमेश्वर मंदिरासमोरून शहरातील मुख्य रस्त्याने भव्य रॅली काढण्यात आली. तालुक्यातील, पोटा, वाघी, सरसम, शिरंजनी, बोरगडी, सवणा, टेंभी, वडगाव, कार्ला, पळसपूर, खडकी, सोनारी, आंदेगाव आदी गावांत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला व एकमेकांना शुभेच्छा दिल्या. 



या वेळी हिमायतनगरचे नगराध्यक्ष कुणाल राठोड, भाजपचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन तुप्तेवार, शिवसेना उपतालुकाप्रमुख विलासकाका वानखेडे, विठ्ठल ठाकरे, राम राठोड, शिवसैनिक चलमेलवार, सावन डाके, विनायक मेंडके, राम नववाडे, गजानन पाळजकर, तालुका संघटक संजय काईतवाड, संतोष गाजेवार, गजानन चायल, दीपक कात्रे, सालीम शेवाळकर, निक्कू ठाकुर, दुर्गेश मंडोजवार, दिनेश राठोड यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZORCA
Similar Posts
‘हेमंत पाटील यांच्या विजयासाठी एकजुटीने काम करू’ हिमायतनगर : ‘शिवसेना-भारतीय जनता पक्ष-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीच्या हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार हेमंत पाटील यांना निवडून आणण्यासाठी हिमायतनगर तालुक्यातील सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना प्रचंड मताने निवडून आणण्याचा
‘ग्रामीण भागाच्या विकासासाठी हेमंत पाटील यांना निवडून द्या’ हिमायतनगर : भाजप-शिवसेना महायुतीचे हिंगोली मतदारसंघाचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांनी हिमायतनगर शहरासह तालुक्यातील सरसम जिल्हा परिषद गटात मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. ‘ग्रामीण भागाच्या विकासासाठी हेमंत पाटलांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या,’ असे आवाहन त्यांनी केले
हिमायतनगरचे नगराध्यक्ष कुणाल राठोड यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा हिमायतनगर : हिमायतनगरचे नगराध्यक्ष कुणाल राठोड यांना १५ मे रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांनी, तसेच समाजाच्या विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी शुभेच्छा दिल्या. ‘जनकल्याणकारी युवा नेता’ अशी ओळख त्यांनी अल्पावधीतच आपल्या कामामुळे निर्माण केली असल्याचे नागरिक सांगतात.
हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार नागेश पाटील यांची सभा हिमायतनगर : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याकडे पाहून देशहितासाठी हिंगोलीतून शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील यांना मतदान करा,’ असे आवाहन आमदार नागेश पाटील-आष्टीकर यांनी केले. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ हिमायतनगर शहरातील परमेश्वर मंदिर मैदानावर येथे नऊ एप्रिलला जाहीर सभा झाली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language